Thursday, January 24, 2008

’तारे जमीन पर’ आणि ’चक दे..’

हल्ली हिंदी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही. गतवर्षीत प्रदर्षीत झालेले ’चक दे...’ आणि ’तारे जमीन पर’ त्यापूर्वीचा रंग दे बसंती’ ही त्याची ताजी उदाहरणे.




बरेच दिवसांपासून ’तारे जमीन पर’ बद्द्ल लिहीण्याचे मनात होते. स्पेशली दर्शिल सफारी बद्द्ल. पण नक्की काय ?.... आणि किती?... पिच्चर चांगला आहे... अभिनय उत्तम... हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही काहीतरी missing आहे. असं राहून राहून मनाला वाटतयं. "पिच्चर चांगला आहे... अभिनय उत्तम" फक्त एवढ्चं!!!!.. नाही अजून बरेच काही सांगून जातो ’तारे जमीन पर’..




स्वतःला २१ व्या शतकातील आधुनिक समाजाचा घटक म्हणवून घेताना. आपण काहीतरी महत्वाचं गमवतोय, ही टोचनं मनाला सलते आहे. समाजाचा, स्वतःच्या भविष्याचा विचार करता करता आपण आनंद घेणं आणि देणं विसरतोय. स्वतःला समाजाच्या बंधनात गुरफटून घेउन आपण खरं तर जगणंच विसरलोय. आयुष्यात भविष्य काळात जगण्यासाठी आपण सर्वच आपला वर्तमान काळ कोरड्य़ा वाळूसारखा हातातून निसटू देत आहोत. आणि दुःख हेच आहे की हे कळूनही आपण हतबलं आहोत. म्हणूनच इथे मला नटसम्राट आठवतोय.. To be or not to be it is a Question..(जगावं का मरावं हा एकच सवाल आहे.)




तारे जमीन पर पाहताना हाच प्रश्न्न डॊळ्यासमो आ वासून उभा राहीला....किंबहूना त्यामूळेच हा प्रश्न मनात घर करून राहीलाय. चित्रपट पाहताना ईशान्त (दर्शिल) च्या वडीलांचा फार राग आला. कोणते वडील इतके निष्ठुर असू शकतात. मनातल्या मनात अपशब्द देखील बोलून झाले. पण जेव्हा चित्रपट गृहातून बाहेर पडलो.. तेव्हा हळूच एका virus ने डोक्याचा ताबा घेण्यास सुरवात केली..... जर मी ईशान्त च्या वडील्यांच्या जागी असतो तर मी काय केले असते????.... & I am shocked.... मी देखील Mr.Avasthi ईशान्तचे वडीलांप्रमाणे च react झालो असतो. In fact आपण तशेच react होतो. परीक्षेत चांगले मार्क मिळत असतील तरच मुलगा हुशार. अन्यथा ढं... हे असं का?? परीक्षा, अभ्यास, मार्क म्हणजेच सर्व काही का? मुलांचा आनंद मह्त्वाचा नसतो??? अमीर चे एक वाक्य इथे मुद्दामच नमूद करावेसे वाटते.."हर एक को अपने घरमे Topers aur Rankers चाहीये...तो बच्चे क्यों पैदा कीये?? breed the racing Hourses damit " खरोखरच आपण विसरलोच आहोत का???....की प्रत्येक मुलाची स्वतःची आवड असते, स्वतःची ईर्षा असते. आणि शाळा फक्त पुस्तकी ग्यान असते क??....प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई आहे. पण मुलांच्या आनंदाच काय?? समाधानाचं काय?? कसे सुःखी होणार आपण?.... समाजाचं,चालू असनार्या competetion चं, त्यावर अवलंबवून असनार्या पालकांच्या अपेक्षांचं ओझं एक कोवळा जीव कसं पेलू शकेल?? त्याचं बालपणं कोमेजून नाही का जाणार? दर्शिलने केलेला ईशान्तचा रोल उत्तमच. ईशान्तचे दुःख, त्याचा हेकेखोरपणा, हट्टीपणा, त्याची होनारी घुसमट, आई बद्दलचा जिव्हाळा, भीती त्याने उत्तमरीत्या साकारल्या आहेत.

Monday, January 14, 2008

पार्टनर.... व.पु.काळे.


नमस्कार मित्रांनॊ...

आज प्रथमच काहीतरी लिहीत आहे. आजच वपुंच पार्टनर वाचून पूर्ण झाले. ही पुस्तक वाचण्याची तिसरी वेळ. नेहमीप्रमाणे ह्या वेळी ही भारावून गेलो. आयुष्याचा नव्याने अर्थ समज़ला. वपुंच्या द्रुष्टीकोनाला सलाम!! माझ्यामते वपुंचा आयुष्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन खरोखरचं खुपं काही शिकवणारा आहे. पार्टनर मधील एक प्रसंग मुद्दामच येथे लिहावासा वाटतो......




"प्रिय पार्टनर,

मुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.

आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.

सुगंधाचं कोडं फुलाला उलकत नाही.

एवढास्सा तू.

त्याहून एवढास्सा मी.
मला जीवनाचा अर्थ कसला विचारतोस? आणि त्यापेक्शाही, संभोगाचा अर्थ लावायचा असतो असं तुला कोणी सांगितले?"

पाणी म्हणजे एच टू ओ.

इथंच सगळे थांबले आहेत. मूर्ख म्हणून नव्हेत, तर जाणकार म्हणून थांबले. पृथःकरण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणून.

कोणता आनंद क्षणजीवी नाही ?

दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो, तोवर 'चव'. खाली उतरला की 'घास'. सुगंधाचं नातं नाकाशी, घशातून आत गेल्यावर फक्त 'हवा'. खर तर सगळ्या पंचेद्रियांच नातं रसिकतेशी नसून तृप्तिशी असतं. तो क्षण संपला की रसिकता संपली. इतर अनेक गरजांपैकी तृप्ती ही गरज आहे. जो गरजू आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो. व्यवहार नेहमीच साधतो असं नाही.

तो सत्यासारखा कटू असतो.

ज्या मनात रसिकता असते, त्याच मनात कटूता निर्माण होते.

सध्या एकच, वर्तमानकाळ संभाळ !

Present tense is the only tense, it takes care of past & future, we look at it in correct prosspective.

तुज्यापेक्षा किरण जास्त भाग्यवान असेल, असं मला वाटतं. तू जागा राहिलास ह्याचा अर्थ ती गाढ झोपलेली असणार. लक्षात ठेव, तिला आयुष्य समजेल अथवा कधीच समजनार नाही. पण तुज्यापेक्षा ती नक्कीच सुखी होईल.


There is no single example of Happy Philosopher.

म्हणून हात जोडून विनंती करतो, Don't be a philosopherJust be a Kiran's husband.


तुझा,

पार्टनर. "





It's Just amazing..
आपल्याजवळ जे आहे ते माणसाला कधी माहीतच नसते. ज्याप्रमाणे कस्तुरी मृग कस्तुरी च्या सुगंधासाठी रान भर फिरतो. ते तर त्याच्या पोटात असते. त्याप्रमाणे सुःखासाठी झगडणारया मानवाला मनाचे समाधान शोधताच येत नाही. आणि जरी ते एखद्या विचारवंताला सापडलेच तरी पुढे काय??
आयुष्यभर जे मिळवण्यासाठी झगडलो... ते मला मिळाले. आता पुढे काय??

"There is no single example of Happy Philosophe" भरपूर काही सांगून जाते हे वाक्य. माणूस जेवढा विचार करतो तेवढा तो असमाधानीच रहातो. So N'joy today dont bother for past or future.

आणि ही कोण्या एकाची कहाणी नाही आहे. ही आपणा सर्वांचीच कहाणी आहे. कारण...........

AS YOU WRITE MORE & MORE PERSONAL IT BECOMES MORE & MORE UNIVERSAL